Pune and Punekars

२९ जुलाई 2011
पावसाचा दुसरा दिवस. पाऊस पडलाच नाही वातावरण मात्र ढगाळ राहिले. 
पुण्याची एक खासियत आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. त्यांत एफ सी रोड एकेरी वाहतुकीचा आहे. प्रत्यक्षात कोणीही अधिकारी--पोलीस किंवा मुनिसिपल-- ह्या गर्दीत प्रवास करतांना दिसत नाही. संध्यकाळी बरेच पोलीस अधिकारी एफ सी रोड वरील वाडेश्वर हॉटेल समोर चेकिंग साठी उभे असतात. आणि त्याच वेळेला उलट दिशेनी जाणारी दोन चाकी वाहने दिमाखाने जातांना दिसतात. मला दिसतात...तुम्हाला दिसतात....मग..? 
काही दिवसापूर्वी मी पुणे ट्राफिक पोलीस यांच्या फेसबुक साईट वर एफ सी रोड वरील हॉटेल वैशाली ते गुडलक चौक या भागातील "डबल पार्किंग" बद्दल लिहिले होते. त्यानंतर दोन/तीन दिवस "सुखाचे" गेले. परंतु नंतर पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' सुरु झाले. याचं टप्यातील वैशाली ते सागर आर्केड या पादचारी मार्गावर रोज संध्याकाळी भरणारी "चौपाटी" मुंबई मधील दादर-गिरगाव-जुहू या चौपाटीला लाजवेल अशी असते. वृद्ध-वयस्कर सोडाच पण तरण्या ताठ्या व्यक्तीला सुद्धा पादचारी मार्गावरून चालतांना कसरत करावी लागते. 
शासनाच्या कोणत्याही विभागाचे इकडे लक्ष नसावे हि पटण्या सारखी गोष्ट नाही. 
वैशाली हॉटेल च्या बाजूने एफ सी रोड व आपटे रोड यांना जोडणारा रस्ता हा खरोखरच एकेरी वाहतुकीसाठी आहे का? असा प्रश्न पडावा इतकी बेशिस्त वाहतूक असते. सणासुदी कधीतरी वाहतूक शाखेचे अधिकारी- कर्मचारी या रस्त्यावरून फेरी मारतात. दोन-चार वाहनांना पकडतात, दंड वसूल करतात व दंड देणारे त्यानंतर अधिकार मिळाल्यासारखे वाहतूक  सुरूच ठेवतात. 
पुण्याची वाहतूक शिस्तबद्ध होण्यास २० वर्षांचा अवधी हवा असे सर्व साधारण म्हटले जाते...पण नातवाला नातीला शाळेत सोडायला जाणारे बाबा/आजोबा जेंव्हा वाहतुकीच्या उलट बाजूने वाहन घेवून बिनधास जातात तेंव्हा " खरच २० वर्षाचा काळ पुरेसा आहे का ?" असा प्रश्न पडतो कारण जेंव्हा तो नातू बाबा किंवा अबोबा होईल तेंव्हा त्याच्या समोर त्याच्या बाबा/आजोबांचं आदर्श डोळ्यासमोर असणारच आहे ना?....
असो....पुणे हे असेच चालायचे. वाहणाऱ्या पाण्यांत हात धुवून घ्या म्हणणारेच पुष्कळ. ...पण कोणीतरी कुठेतरी सुरवात करायलाच हवी व मी सुरवात करायला तयार आहे....कोणी बरोबर येणार का ? 

28 JUNE 2023



Comments

Popular posts from this blog